Type Here to Get Search Results !

तुझ्याविना अप्रकाशित हे तारे


 


💕गंध प्रेमाच्या💕

क्षणोक्षणी आठवण येवो तुझी 

प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी ...


तू दिसतास एकाएकीमन हरवावे 

सहवासात तुझ्या भान हरपून जावे ...


आतुर तुझी एक झलक बघण्यासाठी 

प्रतीक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी ...


तुज्याविना अप्रकाशित हे तारे 

तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे ...


वाटे लाभो सहवास तुझ्या जन्मान्तरी 

व्हावा तुझा जीव माझ्याच अन्तरी ...


संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी 

गंध प्रेमाच्या फुलवीत तुझीच सात हवी ......

तुझीच सात हवी ......👫👫






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad